स्वरसंवाद अर्थात स्वरांमधला संवाद किंवा स्वरांचे परस्परांची घडणारे सकारात्मक संभाषण. अशा संवादामुळे स्वरांचे स्वतंत्र अस्तित्व न राहता त्यातून एक परिपूर्ण सम्यक् गीत अर्थात संगीत निर्माण होते. अशा संगीताशी कलाकारांबरोबरच श्रोतेही एकरूप होतात, त्या कलाकृतीला समर्पित होतात.
मात्र असा स्वरसंवाद नेहमीच साधता येईल अस नाही. त्यासाठी लागतो स्वरांचा अभ्यास अर्थात स्वरसाधना. आदिस्वर ओंकारा पासून स्वरांची उत्पत्ती झाली असं भारतीय तत्त्वज्ञान सांगते. भारतीय संगीत स्वराधिष्ठित आहे. स्वरसाधनेमुळे आध्यात्मिक उन्नती साधता येते. काळाच्या ओघात या संगीतात अनेक बदल घडत आहेत. स्वर - ताल - लय यांचा एकत्रित मिलाफच उत्तम संगीत निर्मिती करतो. लय आणि ताल हे संगीताचे अविभाज्य घटक असले तरीही स्वर हा ओमकार स्वरूप आहे. स्वर हे संगीताचे अधिष्ठान आहे.
समर्थ रामदास स्वामींना आपण श्रीरामभक्त, हनुमानाचे उपासक म्हणून आणि शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ओळखतो. श्री दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके यांचे रचनाकार म्हणूनही समर्थ रामदास स्वामींची ओळख सर्वश्रुत आहे. याशिवाय समर्थांनी विविध विषयांवर विपुल लेखन केलं आहे. अभंग, आरती, स्तोत्र यासारख्या भक्तीपर रचना बरोबरच पोवाडा, गोंधळ, भारुड, गवळण अशा लोकगीतांच्या रचनाही केल्या आहेत. प्रत्ययकारी वर्णनात्मक काव्ये रचली आहेत, समाजकारण, राजकारण, व्यवस्थापन, स्थापत्यशास्त्र, संगीत अशा अनेक विषयांवर त्यांनी चारशे वर्षांपूर्वी केलेले लेखन आजही तितकच प्रभावी ठरतं. दैनंदिन जीवनातील या छोट्या-छोट्या गोष्टींबरोबरच अध्यात्मिक मार्गासाठी मार्गदर्शक लेखनही समर्थ करतात. समर्थांची ही अष्टपैलू काव्यसृष्टी संगीतमय स्वरुपात आपल्या समोर सादर करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
आपण सगळीकडेच स्त्री शक्ती स्त्री-स्वातंत्र्य स्त्री-मुक्ती अशा गोष्टींबद्दल वाचतो, ऐकतो, बऱ्याच चर्चा वाद-विवाद बघतो. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्त्री वेगवेगळ्या रूपात महत्त्वाची भूमिका बजावत असते. या सगळ्या भूमिका बजावताना तिच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात, स्थित्यंतर होत असतात. अबोध निष्पाप बालिका ते वृद्ध प्रगल्भ स्त्री हा तिचा प्रवास आपण या कार्यक्रमातून बघणार आहोत. या तिच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्याची साक्ष देणाऱ्या, तिच्या मानसिक स्थितीचं वर्णन करणाऱ्या गीतांचा आस्वाद घेऊया.......
8, Prayagteerth, Veer Savarkar Road, Naupada, Thane 400601
102, C1 Yaman Chs, Kavyadhara, Dhokali, Kolshet Road, Thane 400607 |
|
+91 98339 64888 | +91 99307 03999 | |
swasauvad@gmail.com |
© 2021. All Rights Reserved | Developed by Sanmisha Technologies